Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चार पेपर पुढे ढकलले

Nov 29, 2022

PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असे एमपीएससीने जाहीर केले आहे.

२४ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, ७ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि १४ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील आयोगाने म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

संत बार्णबा माध्यमिक हायस्कुल येथे पोषण माह २०२२ अंतर्गत विद्यार्थ्यानी निबंध स्पर्धेत  मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला -वैशाली कातकाडे अंगणवाडी सेविकाताई

संत बार्णबा माध्यमिक हायस्कुल येथे पोषण माह २०२२ अंतर्गत विद्यार्थ्यानी निबंध स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला -वैशाली कातकाडे अंगणवाडी सेविकाताई

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक - २. अंगणवाडी क्र. ६८. मनमाड विभाग येथील...

read more
राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी मदतनिस ताई वंदना नारखेडे

राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी मदतनिस ताई वंदना नारखेडे

पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक👉 शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी)...

read more
जिल्हा बँक कडे जमा असलेल्या ठेवी व व्याजेच्या रकमेसाठी मंगळवारी मनमाड शहरात धरणे आंदोलन

जिल्हा बँक कडे जमा असलेल्या ठेवी व व्याजेच्या रकमेसाठी मंगळवारी मनमाड शहरात धरणे आंदोलन

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मनमाड व नांदगाव शाखेत तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या जमा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]