loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – लव्ह जिहाद,धर्मांतर आणि गो हत्या विरोधी कायदा करण्याची नांदगावकरानी मोर्चाद्वारे केली मागणी

Nov 30, 2022


नांदगाव
लव्ह जिहाद ,धर्मांतर गोहत्या याविरुद्ध कठोर कायदा करावा, श्रध्दा वालकर हत्या प्रकरणी जलद न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो युवक, युवती, महिलांंसह नागरिक सहभागी झाले होते.

या मोर्चाचे सकल हिन्दू समाज हिंदूस्थान,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांनी आयोजन केले होते.
शहरातील मालेगाव रोड येथील मविप्र महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेला मोर्चा शनि मंदीर, बालाजी चौक,शिवस्फूर्ती,देवीमंदीर, कालीका चौक,महात्मा फुले चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,रेल्वे गेट मार्गे हुतात्मा चौकात येवून या ठिकाणी मोर्चेकराच्या वतीने घोषणा देवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा ध्वज, भगवा ध्वज युवतींनी, युवकांनी घेतले होते. यावेळी सहभागी झालेल्यांच्या हातात धर्मांतर विरोधी कायदा लागू करा, गोहत्याबंद करा, लव्हजिहादविरोधात कठोर कायदा करा यासह विविध मागण्यांचे फलक होते.युवक, युवती,
महिला व पुरुषांनी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या.
यावेळी डॉ . आनंद पारख, दत्तराज  छाजेड, सागर  फाटे, योगेश  पैठणकर,गणेश शिंदे, महेश  गायकवाड,  डॉ श्रीकांत देवरे, देवराम फुपाने, संदीप कवड़े, संजय सानप, संगीता  सोनवणे, द्वारकानाथ कलंत्री, सूरज  परदेशी राहुल  पैठणकर, सुमित  सोळसे , महेश चौघुले, रवि सोनावणे सिद्धेश भावसार, दर्शन शर्मा, स्वराज शर्मा, विकास शर्मा, मनोज मोकळ,अक्षय पवार,कमलेश काळे, दीपक शिंदे, मयूर शिंदे मयूर खरोटे, शुभम मोकळ, विशाल खेरनार, सौरभ वर्देकर, चेतन जाधव, हर्शल पगार ,शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनीसह ग्रामीण भागातील साकोरा,मुळडोंगरी, मनमाड, मालेगांंव, गंगाधरी, जळगांव खुर्द, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.