loader image

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) पदाला गवसणी

Dec 6, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, दिनांक ६डिसेंबर २०२२ रोजी आय. क्यू. एस. सी. अंतर्गत स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने “स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी” या विषयावरती व्याख्यान व सत्कार आयोजित करण्यात आला होता. यासाठी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रमुख पाहुणे सौ. अश्विनी शेवलेकर यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) या पदासाठी निवड झाली. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आला याप्रसंगी सौ. अश्विनी शेवलेकर यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा मेहनतीच्या जोरावर अधिकारी होऊ शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरणासह सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणतेही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता कष्ट व सातत्य ठेवून विविध परीक्षांमध्ये आपले करिअर करू शकतात तसेच तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी योग्य उपयोग केला गेला तर त्याचा फायदा नक्कीच होतो आपले ध्येय निश्चित असले तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुम्ही सहजपणे पार करू शकतात. अशा प्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील * यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असताना आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे. *स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करण्यास महाविद्यालय सदैव तत्पर आहे. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. पी. जे.आंबेकर सर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुरेश पगार सर,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे सर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख व करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले. प्राध्यापक व इतर सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.