loader image
[ays_poll id=7]

अशोक नगर परिसरातील विज पुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र देवरे यांची मागणी

Dec 17, 2022


सातपूर (प्रतिनिधी) :- येथील अशोक नगर परिसरातील अनेक ठिकाणी अचानक तिन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, महावितरणाने विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी नागरिकांसह केली आहे.

सातपूर व अशोक नगर परिसरातील सावरकरनगर, बळवंतनगर, जाधव संकुल, वास्तूनगर, विश्वासनगर, राज्य कर्मचारी वसाहत आदी भागांत काही दिवसांपासून अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या आहे.

प्रकाराच्या वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, पावसाळ्यात पाऊस येण्याच्या आधीच लाईट बंद केली जाते. समोरच्या परिसरात लाईट असते म्हणजे सातपूर कॉलनीत लाईट असते व सावरकरनगर या भागात लाईट नसते. अनेक नागरिकांना याचे कारणही माहीत नसते. लाईट गेल्यावर महावितरण विभागाला फोन केला, तर त्यांचे ठरलेले उत्तर असते, की रिपेअरिंगचे काम चालू आहे. तीन-चार तासांत लाईट येईल. रिपेअरिंगच्या नावाखाली किती दिवस वीजपुरवठा खंडित करणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. महावितरण विभागाने नागरिकांची समस्या त्वरित दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.