loader image
[ays_poll id=7]

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मनमाड स्थानकात ३६ हजाराचा दंड वसूल

Dec 20, 2022


मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने विभागाच्या महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर एकूण ८६ रेल्वे गाड्यात राबविण्यात आलेल्या एक दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ३९१५ केसेस करून २३.२७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.

भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडीया यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज मानसपुरे, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव ते धुळे, जलंब ते खामगाव विभागाची एक दिवसीय तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. तिकीट तपासणी मोहिमेत वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ८६ गाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली.

मोहीम यशस्वी करण्यासाठी ३ अधिकारी, १८० तिकीट चेकिंग स्टाफ, ४५ वाणिज्य स्टाफ व ५५ आरपीएफ स्टाफ असे एकूण २८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ओपन डिटेल स्टाफ यांनी ३४१९ केसेस करून १९ लाख ९७ हजार ५६५ रुपये, स्टेशन स्टाफ यांनी २०३ केसेस करून १ लाख ५ हजार २७० रुपये, अमेनिटी स्टाफ २९३ केसेस करून २ लाख २४ हजार 251 रुपये वसूल केले.


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.