loader image
[ays_poll id=7]

एस टि.महामंडळाच्या कारभाराला वैतागून चांदोरा येथे बस अडवून निषेध

Jan 4, 2023



नांदगाव : नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथील शालेय विद्यार्थी व नागरिकांची एस टी महामंडळाच्या मनमानी सेवेमुळे हाल होत असून त्यातून शालेय शिक्षणाचा बोजवारा उडत असल्याने नागरिक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत.आज या संतापाचे रूपांतर आंदोलनात होऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे गनप्रमुख व चांदोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली चांदोरे नांदगाव बस रोखून ठेवण्यात आली.
नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथून नांदगाव येथे शालेय विद्यार्थी बसने प्रवास करतात त्यासाठी त्यांनी मासिक पास काढले आहेत.तसेच नागरिक ही कामानिमित्त नांदगाव येथे जात असतात.मुख्य महामार्गापासून चांदोरे हे गाव चार किलोमीटर अंतरावर असल्याने विद्यार्थी व नागरिकांना नांदगाव जाण्यासाठी चार किलोमीटर पायी चालावे लागत असल्याने विद्यार्थी व नागरिकांच्या मागणीनुसार नांदगाव चांदोरे एस टी बस सुरु करण्यात आली.मात्र या बसची सेवा अनियमित होत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.


आज या संतापाचे रूपांतर आंदोलनात होऊन चांदोरे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच शिवाजी जाधव यांचे नेतृत्वाखाली नांदगाव चांदोरे बस अडवून ठेवण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.