Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावचे गवळी आणि कांबळेंची मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी निवड

Jan 7, 2023

वर्धा येथे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्ट्यासाठी नांदगाव येथील गझलकार काशिनाथ गवळी आणि रविंद्र कांबळे यांची निवड झाली आहे. संमेलन दि. ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून तीनही दिवस गझल कट्ट्यावर मुशायरे होणार आहेत. यात पहिल्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला संमेलनाच्या उद्घाटन समारोहानंतर दुपारी २ वाजता गझल कट्ट्याचे उद्घाटन होईल आणि मुशायऱ्यांना सुरुवात होईल. पहिल्या दिवशी साधारणतः पाच-सहा मुशायरे होणार असून यात प्रामुख्याने विदर्भातील गझलकारांचा सहभाग राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार, दि. ४ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान आठ ते दहा मुशायरे होतील. तर समारोपाच्या दिवशी दि. ५ फेब्रुवारीला पुन्हा पाच-सहा मुशायरे होतील. या दोन्ही गझलकारांचे व कवितेसाठी कवयत्री प्रतिभा खैरनार यांची कविता वाचनासाठी निवड झाली आहे .
त्यांचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगांव तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष  आनंद शिंदे  यांची सहकार क्षेत्रा तील अग्रगण्य नामको बँकेच्या ग्राहक सेवा व तक्रार निवारण समिती वर नियुक्ती

भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे यांची सहकार क्षेत्रा तील अग्रगण्य नामको बँकेच्या ग्राहक सेवा व तक्रार निवारण समिती वर नियुक्ती

येवला - भाजपा चे नासिक ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आणि उद्योजक आनंद शिंदे यांची सहकार क्षेत्रा तील...

read more
पोषण महा २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन  – शितल गायकवाड (एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक-२.मुख्यसेविका)

पोषण महा २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन – शितल गायकवाड (एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक-२.मुख्यसेविका)

अंगणवाडी क्र.७८,७९,८०. मध्ये आज स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली ..या कार्यक्रमास मा.नगर आध्यक्ष...

read more
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी मनमाड शहरात : शिवसैनिकांत चैतन्याचे वातावरण

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी मनमाड शहरात : शिवसैनिकांत चैतन्याचे वातावरण

शुक्रवार दिनांक २३/९/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]