loader image
[ays_poll id=7]

मविप्र च्या ज्ञानसंकुल मध्ये भरला आनंद मेळा

Jan 7, 2023


मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मिडिअम स्कुल मध्ये आनंद मेळा उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्याच्या उद्देशाने विद्यालयाच्या संकुलात आनंद मेळावा भरविण्यात आला होता. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची अनुभूती देण्यात आली. मेळाव्यात 40 विद्यार्थी सहभागी झाले होते, व 20 स्टॉल ची मांडणी करण्यात आली होती. उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. विनोद भाऊ डमरे, शिक्षक पालक संघा चे अध्यक्ष श्री. विकासभाऊ करकाळे ,तसेच सैन्य दलात कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष पालक श्री. सचिन भाऊ काळे उपस्थित होते.

नांदगाव तालुका संचालक मा. श्री. अमित भाऊ बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. त्यात मिसळ पाव, पाव भाजी, भजी, भेळ, पाणी पुरी, इडली चटणी, गुलाबजाम, जिलेबी, सँडविच, आदी पदार्थ होते. विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.

पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षण गरजेचे असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पुनम मढे मॅडमनी व्यक्त केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी वैशाली काळे, रुपाली शेलार, प्रियांका धात्रक, शीतल आहेर, ज्योती आहेर, सोनाली निश्चित, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
.