loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

Jan 8, 2023

मनमाड ता ७ : दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार पतिषद, मुंबई सलग्नीत नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने साजरी करण्यात आली.

महात्मा फुले वाचनालय व अभ्यासिका येथे नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी तर जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, तालुकाध्यक्ष अमोल खरे, संजय मोरे, नरहरी उंबरे उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल खरे यांच्याहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, संजय मोरे, नरहरी उंबरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करतांना जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी म्हणाले की, बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलत असून आपली लेखणी ही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झिजली पाहिजे. त्यामुळे तरुणांनी पत्रकारितेत यायला पाहिजे. नांदगाव तालुक्यातील नारपारचे पाणी मिळावे यासाठी पत्रकार म्हणून आपल्याला भूमिका घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडत
राजकिय पक्ष पत्रकारांचा वापर करून घेतात पत्रकार दिनी देखील शुभेच्छा देण्याचे कष्ट देखील घेतले जात नाही त्यामुळे पत्रकार उपेक्षित राहत असल्याची खंत व्यक्त करत आपला नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ एकसंघ असल्याचे स्पष्ट मत मांडले. जेष्ठ पत्रकार नरहरी उंबरे म्हणाले की पत्रकार संघाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू असून वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहे.

जेष्ठ पत्रकार संजय मोरे म्हणाले की, कोणी कुठे जा काही टेन्शन नाही पत्रकार संघ एकसंध आहे आणि एकसंध राहणार. कोणाच्या जाण्याने की येण्याने काहीच फरक पडत नाही. अगदी जोमाने काम करू असे प्रतिपादन केले. तर नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे काम अगदी जोमात सुरू असून वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. जेष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार संघाचे कार्य जोमाने पुढे नेले जात असल्याचे सांगितले. पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष निलेश वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकेत पत्रकार संघाची नव्याने निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीचे स्वागत करून भूमिका विशद केली.  सोमनाथ घोंगाने, अनिल आव्हाड, अशोक बिदरी, प्रमित आहेर, बाबा बोरसे, रामदास सोनवणे, प्रज्ञानद जाधव, योगेश म्हस्के, आंनद बोथरा, गणेश केदारे, रुपाली केदारे, निलेश्वर पाटील, पंकज आहेर, नाना आहिरे, ज्ञानेश्वर दुकले, राजू लहिरे, योगेश देशपांडे, सोमनाथ तळेकर, राजेंद्र धिंगाण, निलेश व्यवहारे, अनिस शेख, किरण भालेकर, राजेंद्र जाधव,
सूत्रसंचालन सहकार्याध्यपक्ष उपाली परदेशी यांनी केले तर आभारप्रदर्शन सरचिटणीस संदीप जेजुरकर यांनी केले.

पत्रकार अनिल आव्हाड यांची कार्याध्यक्षपदी निवड ..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी नांदगांवचे पत्रकार अनिल आव्हाड यांनी यावेळी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल खरे, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, नरेश गुजराथी, संजय मोरे, नरहरी उंबरे आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
.