Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

Jan 9, 2023

जगातील सर्वात लांब लक्झरी रिव्हर क्रूझ ‘गंगा विलास’ ला १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहे. गंगा विलास उत्तर प्रदेशातील वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगड ला जाईल. गंगा विलास ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीत ३२०० किलोमीटरचे अंतर कापणार आहे. या दरम्यान क्रूझ भारत आणि बांगलादेशातील गंगा, भागीरथी, हुगळी, ब्रह्मपुत्रा आणि वेस्ट कोस्ट कॅनॉल इत्यादींसह २७ नद्यांमधून जाईल.

गंगा विलास जागतिक वारसा स्थळांसह ५० हून अधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या सहलीवर घेऊन जाईल. ज्या ठिकाणी क्रूझ थांबेल ती ठिकाणे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. गंगा विलास सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासह अनेक उद्यान आणि अभयारण्यांमधूनही जाईल.

क्रूझचा अनुभव आनंददायी बनवण्यासाठी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, जिम, स्पा, ओपन-एअर ऑब्झर्व्हेशन डेक, वैयक्तिक बटलर सेवा इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 12 नोव्हेंबर रोजी ट्विट केले की, जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूझ पुढील वर्षी जानेवारीमध्ये आपला प्रवास सुरू करेल. गंगा विलास भारतातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन सर्वात मोठ्या नद्यांवर ४००० किलोमीटरचे अंतर पार करेल. ही क्रूझ पवित्र वाराणसी ते बांगलादेशमार्गे दिब्रुगडपर्यंत जाईल.

अधिकृत वेबसाइटनुसार, गंगा विलासमध्ये ८० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. गंगा विलास एक लक्झरी क्रूझ आहे. ज्यामध्ये १८ सुइट्स आणि इतर सर्व संबंधित सुविधा आहेत. सुइट्सचे आर्किटेक्चर राजेशाही शैलीत डिझाइन केलेले आहे. ही क्रूझ कोलकात्यातील हुगळी नदीपासून वाराणसीतील गंगा नदीच्या काठावर असलेल्या विविध प्रमुख ठिकाणी जाणार आहे.
गंगा विलास क्रूझ वाराणसीहून आपला प्रवास सुरू करेल. आठव्या दिवशी ते बक्सर, रामनगर आणि गाझीपूरमार्गे पाटण्याला पोहोचेल. पाटणा येथून ही क्रूझ कोलकात्याच्या दिशेने रवाना होईल. २० व्या दिवशी गंगा विलास फरक्का आणि मुर्शिदाबाद मार्गे पश्चिम बंगालच्या राजधानीत पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ढाक्याला निघून बांगलादेश सीमेवर प्रवेश करा. त्यानंतर पुढील १५ दिवस ही क्रूझ बांगलादेशच्या पाण्यात राहणार आहे. शेवटी, क्रूझ गुवाहाटी मार्गे भारतात प्रवेश करेल आणि सिबसागर मार्गे दिब्रुगडला पोहोचून प्रवास संपेल.

अजून बातम्या वाचा..

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]