loader image
[ays_poll id=7]

एल आय सी सर्वश्रेष्ठ छात्रा पुरस्कार

Jan 12, 2023


 के आर टी शाळेमध्ये प्रथम वर्ष पुरस्कार यावर्षी एल आय सी मनमाड तर्फे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना students of year म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . सौ रुपाली निंभोरकर यांनी प्रास्ताविक केले .आणि आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला. एल आय सी ऑफ इंडियाचे ब्रांच मॅनेजर अरूण सोनवणे. डेव्हलपमेंट ऑफिसर सुनिल वाढवणे हे स्थापना दिन साजरा करतात. आणि त्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवतात .त्यातील हा एक वेगळ्या लेव्हल वर सिलेक्ट झालेल्या अशा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. परदेसी साईराज राजेश या विद्यार्थ्याला वेटलिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल मिळाल्यामुळे अश्विन कुमार प्रल्हाद गीते याला कुस्ती स्पर्धेत त्याची डिव्हिजनल लेवहला सिलेक्ट झाल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला. सार्थक सुनील वाढवणे या विद्यार्थ्याला बुद्धिबळ स्पर्धेत डिव्हिजनल सिलेक्ट झाल्यामुळे. श्रावणी अमर चव्हाण हिला विज्ञान प्रदर्शनामध्ये .ब्राह्मी सयाजी गायकवाड शैक्षणिक क्षेत्रामुळे. वेदांत संतोष जाधव याला चित्रकारितेमुळे. ओम कुशल सांगळे .कपिल संजय शिलेलान .आदित्य सुनील वाघमारे. सृष्टी कुशल सांगळे .या विद्यार्थ्यांना कराटे मध्ये डिव्हिजनल लेवहला सिलेक्ट झाल्यामुळे आणि सई संतोष झाल्टे ला वकृत्व स्पर्धेमुळे सन्मानित करण्यात आले. ब्रांच मॅनेजर अरुण सोनवणे डेव्हलपमेंट ऑफिसर सुनील वाढवणे यांनी विद्यार्थ्यांना एलआयसी विषयी मार्गदर्शन व माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना ट्रॉफीच्या स्वरूपात पुरस्कार देण्यात आले. त्यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर आणि सेमिनार साठी आलेले शरद दळवी सर हे यावेळेस उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.