loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसूली विरोधात पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थाना समोर बिऱ्हाड आंदोलन

Jan 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसुली विरोधात पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुली चा धडाका लावला आहे.जमिनीचा लिलाव काढण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६तारखेला पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटने तर्फे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्राम गृह नांदगाव येथे बैठक पार पडली. या आंदोलनासाठी आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस ,युवा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
या बैठकीसाठी शेतकरी बचाव समन्वयक बापुसाहेब महाले व निवृत्ती पगारे जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, परशराम शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघटना, व भोजराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, यावेळी परशराम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता, अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तसेच बापुसाहेब महाले व गारे पाटिल, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांची भाषणे झाली, यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष विजय पाटील चव्हाण, सोपान पवार, आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, शेतकरी संघटनेचे ता .अध्यक्ष मच्छिंद्र वाघ, निव्रूती दादा खालकर, विठ्ठल दादा आहेर, रमेश बागुल, सुदान काळे, शिवाजी जाधव, राकेश चव्हाण, मधुकर बोरसे, वसंतराव मोरे सुभाष चव्हाण, अरूण पवार, देविदास देवरे अक्षय सरोदे, सोमनाथ शिंदे आदि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

 

प्रतिक्रिया
निलेश चव्हाण
स्वाभिमानी शेतकरी संघटना

जिल्हा बँकेने सुरू केली सक्तीची वसुली बेकायदेशीर असून ती तात्काळ थांबून राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेला ओटीएस कायद्यात सहभागी करावी व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे मत निलेश चव्हाण यांनी मांडले


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.