मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी,शेख आरिफ कासम यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळेतील उपशिक्षिका सविता सचिन कराड व विदयार्थी व विद्यार्थींनिंनी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा प्रारंभ
नांदगाव ः मारुती जगधने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 13 /5...









