loader image

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू

Jan 25, 2023

दरेगाव – ( गोरक्षनाथ लाड ) चांदवड तालुक्यातील निमोण येथील सेजल सोमनाथ जाधव (वय ५) ही चिमुरडी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे.निमोण मनमाड रस्त्यालगत शेतात राहणा-या भिकाजी जाधव यांची नात शेजल सोमनाथ जाधव ही सकाळी तीचे मतीमंद आई वडील आपल्या कामात मग्न असताना ती घराच्या पाठीमागे प्रातविधीसाठी गेली होती. त्याचवेळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने तीच्या वर हल्ला केला. सेजलच्या शरीराचे लचके तोडत तीला घरापासून काही अंतरावर शेतात ओढत नेत ठार केले. ती बराच वेळ झाला म्हणून घरी परत आली नाही म्हणून तीच्या कुटुंबियांनी तीचा शोध घेतला असता ती मृत अवस्थेत आढळली.

या घटनेने संपूर्ण निमोण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी घटनास्थळी वनपाल भाऊसाहेब सोमवंशी, वनरक्षक खंदारे, तलाठी सौरभ पिसोळकर, पोलीस पाटील हिरामण देवरे आदींनी पाहणी केली. या घटनेमुळे निमोण ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
निमोण परीसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचाही वावर आहे.त्यामुळे नागरीकांमध्ये अधिकच भितीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ वनहद्दी लगत वावर असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच डॉ. स्वाती भाऊराव देवरे, उपसरपंच हनुमान दखणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पंकज दखणे, प्रविण बोडके आदींनी केली आहे.

मृत शेजल आई वडीलांची अत्यंत लाडकी होती.अत्यंत गरीब असलेल्या या जाधव कुटुंबातील शेजलचे वडील सोमनाथ जाधव हे मतीमंद आहे.तर आई देखील मतीमंद आहे. मतीमंद असलेल्या आई वडिलांचा तीच्या रुपाने भविष्यातील आधारच आज काळाने हिरावला आहे. या दुर्देवी घटनेने जाधव कुटुंब पुर्णपणे हतबल झाले आहे. मृत शेजलच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळायला हवी

अजून बातम्या वाचा..

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.