loader image
[ays_poll id=7]

पोस्ट खाते महाराष्ट्रात तब्बल २५०० जागा – दहावी उत्तीर्ण व्यक्तींना सुवर्णसंधी

Jan 29, 2023


भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली असून यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडिया पोस्टमध्ये ब्रँच पोस्टमास्तर (बीपीएम), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (एबीपीएम) पदांच्या एकूण ४० हजार ८८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच ती १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही भरती प्रक्रिया म्हणजे उत्तम संधी आहे.ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म एडिट विंडो १७ ते १९ फेब्रुवारीपर्यंत खुली राहील. या भरतीप्रक्रियेंतर्गत महाराष्ट्रामध्ये २ हजार ५०८ जागा भरल्या जातील.
इंडिया पोस्ट जीडीएस भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता आणि अटीशर्ती पुढीलप्रमाणे आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीच्या वर्गात गणिती आणि इंग्रजी शिकलेला असावा. उमेदवारांचं वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षांपर्यंतच असावं. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयामध्ये सवलत देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीचं शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. मात्र सर्व महिला, ट्रान्स वुमन आणि सर्व अनुसूचित जातीच्या उमेदवारांना शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.