loader image
[ays_poll id=7]

अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विषयावर प्रात्यक्षिके व व्याख्यान संपन्न..

Feb 9, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी विद्यार्थ्यांसमोर काही वैज्ञानिक प्रयोग सादर केले. समाजात अनेक भोंदूगिरी करणारे अज्ञानी व भोळ्याभाबड्या लोकांना अनेक चमत्कार आणि हातचलाखीच्या करामती करून दाखवतात व त्या आधारे लोकांची फसवणूक करतात. आपल्यात काहीतरी दिव्य शक्ती असल्याचे भासवतात पण ते चमत्कार नसून विज्ञानाचे प्रयोग व हातचलाखीचे खेळ असतात हे सांगून काही विज्ञानावर आधारित प्रात्यक्षिके सादर केली. रिकाम्या तांब्यातून वारंवार पाणी येणे, कंबरेचा पट्टा हवेत तरंगणे, दगड चमच्यातील पाणी पितो आणि वाटतील कचरा आपोआप पेट घेतो आदी जादूचे प्रयोग करून दाखवले व त्यामागील वैज्ञानिक स्पष्टीकरणही दिले. विद्यार्थ्यांनी ते प्रयोग स्वत करून पाहिले. त्यासाठी निरिक्षण, तर्क, अनुमान, निष्कर्ष व प्रयोग ही पंचसूत्री अंगीकारावी व सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत व कुठल्याही भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याचे आवाहन केले.
जीवनातील प्रत्येक घटनेकडे डोळस पणे पाहण्याची गरज असून आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याला, आपल्या कुटुंबाला परिणामी समाजाला भोंदू लोक गंंडवतात, फसवणूक करतात. हे होऊ नये म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञान दूर करून प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा व स्वतः बरोबर समाजाची प्रगती साधावी. त्यासाठी शिक्षण हेच खरे प्रभावी माध्यम असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांनी प्रतिपादन केले. यावेळी मा. गोराणे सरांचा पुष्पगुच्छ व शॉल देऊन मुख्याध्यापक मा. गवळी सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री. गोकुळ बोरसे, कैलास पठाडे, श्रीमती अलका शिंदे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, आबा सोनवणे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय व आभार श्री. संजय कांदळकर यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.