loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड सार्वजनिक वाचनालयात संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न

Feb 15, 2023

मनमाड सार्वजनिक वाचनालयात संस्कार खेळवाडीतील चिमुकल्याची ग्रंथ भेट सहल संपन्न आज मनमाड शहरातील संस्कार खेळवाडी या संस्कार शाळेच्या अडीच ते पाच वर्ष वयोगटाच्या चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांनी व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयला क्षेत्र भेट दिली. आजच्या आधुनिक विश्वा मध्ये सोशल मीडिया ला अनन्य साधारण महत्व आले आहे.व्हाट्स ऍप्प, फेसबुक, त्याच बरोबर टेलिव्हिजन ने देखील नवीन पिढी ला प्रचंड आकर्षित केले आहे म्हणूनच अगदी बाल वयातच बालकांना पुस्तकं म्हणजे काय ? याची ओळख व्हावी याच उद्देशाने या अभिनव कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथ /पुस्तके अगदी कुतूहलाने पहिली. काही चित्रमय पुस्तके त्यांना हाताळण्यास देण्यात आली चित्रमय पुस्तकातील रामायण महाभारत यातील अनेक पात्र ची ओळख व नावे विद्यार्थ्यांनी त्वरित सांगितली तर वाचनालय च्या भिंती वर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी , झाशीची राणी याच्या सह अनेक राष्ट्रपुरुष ची ओळख ही विद्यार्थी नी सांगितली यावेळी मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितिन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, संस्कार खेळवाडी चे उमेश कुलकर्णी, सौ कविता अहिरे, सौ रुपाली गागरे, रुपाली बागुल मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी उपस्थित होते. वाचनालय चे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद करीत त्यांचे प्रश्न ची उत्तरे दिली या अभिनव उपक्रमात 50 पेक्षा जास्त बाल विद्यार्थी नी सहभाग घेतला. कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.