loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालय दुरुस्ती व अद्यावतकरणे साठी 25 लक्ष रुपये निधी देणार – आमदार सुहास अण्णा कांदे

Feb 19, 2023


मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी करण्यात आली.सालाबादप्रमाणे यंदाही मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक वैभव असणाऱ्या व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन अविरत पणे 109 वर्षा पासून साहित्य, वाचन, शैक्षणिक क्षेत्रात शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे 393 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नांदगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2023 चे अध्यक्ष सुहास अण्णा कांदे प्रमुख अतिथी म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितिन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, संचालक नरेश गुजराथी , प्रज्ञेश खांदाट माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, माजी नगराध्यक्ष शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, शिवसेना नेते राजाभाऊ भाबड, आरपीआय चे गंगादादा त्रिभुवन आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे शाल श्रीफल देऊन नितीन पांडे, कल्पेश बेदमुथा, नरेश गुजराथी यांनी यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे यांनी वाचनालया ची माहिती प्रास्ताविक मध्ये दिली तर संचालक नरेश गुजराथी यांनी आजच्या सोशल मीडिया च्या आधुनिक काळात वाचन संस्कृती टीकावी म्हणून नांदगाव तालुका व मनमाड शहरात मनमाड सार्वजनिक वाचनालय गेल्या 109 वर्षा पासून अखंड पणे वाटचाल करीत आहे परंतु आजची वाचनालय ची वास्तू ही जुनी झाली असून या वाचनालय वास्तू दुरुस्ती साठी व अद्यावत करणे साठी आमदार सुहास अण्णा कांदे निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.मनमाड सार्वजनिक वाचनालय साहित्य, वाचन संस्कृती टिकवण्या साठी करीत असलेल्या निःस्वार्थ कार्या चा गौरव करीत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांचे आमदार निधी अंतर्गत मनमाड सार्वजनिक वाचनालय दुरुस्ती व अद्यावत करणे कामी रुपये 25 लक्ष निधी जाहीर केला त्यातील 10 लक्ष रुपये चा पहिला टप्पा याच वर्षी देण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले तर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पाणी प्रश्न, व इतर विकास सह सामाजिक बांधिलकी म्हणून वाचन संस्कृती ला बळ देऊन मनमाड सार्वजनिक वाचनालय साठी निधी दिला म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा संचालक नरेश गुजराथी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला राकेश ललवाणी अमजद पठाण, महेश बोराडे, अक्षय सानप भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी विशाल छाजेड, मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी मच्छिन्द्र साळी आदी मान्यवर सह वाचक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे, व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.