loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात तृणधान्यविषयी प्रगतिशील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

Feb 22, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे युनोस्को ने घोषित केलेल्या “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023” निमित्त दरेगावचे पोलीस पाटील प्रगतिशील शेतकरी मा. सोमनाथ गांगुर्डे यांचे तृणधान्या विषयीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील हे होते. मा. सोमनाथ गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतातून बाजरी, ज्वारी, नाचणी यासारख्या कडधान्यांचे आहारातील महत्त्व विशद करून, त्या पिकांवर होणारे वातावरणीय बदलांचे परिणाम याविषयी अनुभव पर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे( गांडूळ खत) वळले पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्त्व बघता त्यावर संशोधनात्मक दृष्टीने काम करून त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे डी वसईत, सूत्रसंचालन एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन सिंग परदेशी तर आभार प्रदर्शन डॉ.गणेश गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे, नॅक कॉर्डिनेटर डॉ. मिलिंद आहिरे, एनसीसी प्रमुख कॅप्टन प्रकाश बर्डे, एनएसएस स्वयंसेवक स्वयंसेवीका, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.