loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

Feb 27, 2023


मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये प्रख्यात कवी, लेखक, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स्वर्गीय कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) जयंती म्हणजेच मराठी भाषा दिन आणि स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे 57 व्या पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या कार्यक्रमाला मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, संचालक नरेश गुजराथी, माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, दिपक शिंदे, प्रज्ञेश खांदाट आदी मान्यवर उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रज, व वीर सावरकर यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. मनमाड शहरातील जेष्ठ समाजसेवक नामदेवराव गिडगे काका यांनी मराठी भाषा दिनाचे निमित्ताने मनमाड सार्वजनिक वाचनालयास सुमारे 15000/-किंमती ची दुर्मिळ धार्मिक, अध्यात्मिक,योगशास्र पौराणिक विषयची ग्रंथ /पुस्तके भेट दिली मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी नामदेवराव गिडगे यांचे ऋण /आभार व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्य वीर सावरकर आणि कवी कुसुमाग्रज यांचे वर लिखित आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथ /पुस्तकांचे प्रदर्शन वाचकांना साठी मांडण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले तर मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी सह वाचक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव  सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार...

read more
फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

  फलक रेखाटन - देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
.