कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आर.टी.ई. अंतर्गत २५% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत गुरूवार, दि.०२ मार्च २०२३ रोजी स.११.०० वा. कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालकांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती.
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांनी मांडले तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ व २०११ यातील कलम १२ (१)(सी) नुसार २५% जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांमुलींसाठी राखीव ठेवण्याच्या असलेल्या तरतुदीबाबत व प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर माहिती शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी उपस्थित पालकांना दिली.
सदर प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन राबविण्याबाबत शासनाकडून संभाव्य वेळापत्रक जाहिर झालेले असून त्यासाठीचे संकेतस्थळ www.rte25admission.maharashtra.gov.in असे आहे. हि प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन होणार असून दि. ०१ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२३ या कालावधीत पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे.
२५% प्रवेशासाठी वंचित घटक जसे एस.सी., एस.टी, व्हि.जे., एन.टी., ओबीसी, एस.बी.सी. इत्यादी प्रवर्गाचा समावेश आहे व दुर्बल घटकासाठी खुला प्रवर्ग व अल्पसंख्यांक शिवाय दिव्यांग विदयार्थी इत्यादींचा समावेश आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी जन्माचे प्रमाणपत्र व वास्तवाचा पुरावा तसेच बालकाचे दि.३१ डिसेंबर रोजी ६ वर्ष वय प्रवेशास पात्र आहे. वंचित घटकांतील प्रवर्गासाठी पालकांचे जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तर दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यानं करीता १ लाखापेक्षा कमी असलेले कायदयात नमूद सक्षम आधिका-याचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. दिव्यांग विदयाथ्र्यांकरीता ४०% पेक्षा जास्त अपंगत्वाचे समक्ष आधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय घटस्फोटीत आई, विधवा महिला, अनाथ बालके, कोव्हीडबाधीत व एचआयव्ही बाधीत बालके यांच्यासाठीही कायदयात नमुद कागदपत्रांप्रमाणे प्रवेश अर्ज करता येईल.
पालकांनी वरीलप्रमाणे विहीत मुदतीत प्रवेशप्रक्रिया पुर्ण करावी. चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास प्रवेश रद्द होतील याची नोंद घ्यावी. ऑनलाईन पध्दतीने मुदतीत अर्ज भरल्यानंतर सोडत पध्दतीने प्रवेश मिळालेल्या पालकांनी विहीत मुदतीत पडताळणी समितीकडून पडताळणी करून आपापले प्रवेश दिलेल्या मुदतीतच निश्चित करावेत. तसेच माहितीसाठी शाळेमध्ये दर्शनी भागास लावलेल्या माहितीफलकाची व त्यावर नमुद शासनपत्र काळजीपुर्वक पहावेत व संपुर्ण प्रवेशप्रक्रियेस शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेले शासननिर्णय, त्यातील नियम व अटी अंतिम व बंधनकारक असतील असे श्री. मुकेश मिसर यांनी नमूद केले. तरी वंचित व दुर्बल घटकातील पात्र बालकांच्या पालकांनी सदर प्रवेशप्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. मुकेश मिसर यांनी केले.
सदर प्रवेशप्रक्रिया संपुर्णपणे ऑनलाईन व लॉटरी पध्दतीने आहे. प्रवेश मिळणे अथवा अपात्र ठरणे यासाठी मुख्याध्यापक, शालेय प्रशासन, संस्था व संबंधित शिक्षणविभाग जबाबदार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे श्री. राम महाले आणि सौ. गौरी जोशी यांनी दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर, सौ. ज्योती खैरे व सौ. राजश्री बनकर यांच्यासह इतर शिक्षक-शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.