loader image
[ays_poll id=7]

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

Mar 10, 2023

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी (दि.९) मंजूर केला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सध्याची मनमाड नगर परिषदेची इमारत नादुरुस्त असल्याने व अनेक ठिकाणी पडझड झाल्याने नवीन इमारत बांधण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत गुरुवारी विधानसभेत आपल्या भाषणात मनमाड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १० कोटींचे अनुदान मंजूर करत असल्याची घोषणा केली आहे.

नवीन नगर परिषद प्रशासकीय
इमारतीच्या प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के हिस्सा हा राज्य शासनाचा व १० टक्के हिस्सा मनमाड नगर परिषदेचा राहणार आहे. कार्यान्वयन यंत्रणाही मनमाड नगर परिषद राहणार आहे. त्यानुसार लवकरच या कामाची ई- निविदा निघणार आहे. सदर काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ राहणार आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली ९० टक्के म्हणजे ९ कोटी रुपयांची अनुदानाची रक्कम तात्काळ मनमाड नगर परिषदेला कोणत्याही प्रकारची कपात न करता वितरित केली जावी, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यात नगर परिषदेने १० टक्के म्हणजे, १ कोटी रुपयांचा स्वनिधी भरायचा आहे. या निधीमुळे नगरपरिषदेची अद्ययावत इमारत होणार असल्याने अनेक अडचणी दूर होणार आहेत.

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
.