loader image
[ays_poll id=7]

तालुक्यातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा आणि सेतू सुविधा पुरविण्याचा बोराळे – आमोदे येथून शुभारंभ, आमदार कांदे यांचा अभिनव उपक्रम

Mar 12, 2023

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याचा शुभारंभ शनिवार दिनांक ११ मार्च रोजी करण्यात आला.
विकासपुरूष आमदार सुहास कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगांव मतदार संघातील नागरिकांना मोफत फिरता दवाखाना व मोफत शासकीय कार्यालय या सुविधांचा शुभारंभ नांदगाव तालुक्यातील आमोदे व बोराळे गावात शनि. दि. ११ रोजी करण्यात आला. उपकरणांसह दोन गाड्यांचे युनिट डॉक्टर, सिस्टर, मदतनीस, डोळ्यांचे डॉक्टर, सेतू कार्यालय प्रतिनिधी व स्टाफ सोबत शनिवार दि. ११ रोजी सकाळी ९ वाजता दोन्ही गावात पूजा करत नारळ फोडून या सेवा देण्यास सुरूवात करण्यात आली.

पहिल्याच दिवशी बोराळे येथे नागरिकांसाठी सुसज्ज अद्ययावत मोफत फिरता दवाखाना मार्फत २६४ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात येवून ३० नागरिकांना ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. २५० जणांना डोळ्यांचा चष्मा देण्यात आला. तर ओपीडीत ७२ जणांची तपासणी करण्यात येवून औषध-गोळ्या देण्यात आल्या. मोफत शासकीय कार्यालय या सुविधेमार्फत ५५ नागरिकांनी शासकीय दाखले घेण्याचा लाभ घेतला.

डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यातील ३६ जणांना ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला तर २३५ जणांना डोळ्यांचा चष्मा देण्यात आला. ओपीडीत १०० जणांची तपासणी करण्यात येवून औषध गोळ्या देण्यात आल्या. मोफत शासकीय कार्यालय या

सुविधेमार्फत ४५ नागरिकांनी शासकीय आमोदे येथे ३०५ नागरिकांच्या दाखले घेण्याचा लाभ घेतला.

आमोदे व बोरोळे येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली. नागरिकांना डोळ्यांच्या तपासणी नंतर तात्काळ मोफत चष्मा वाटप करण्यात येत आहे, तसेच औषधे देण्यात येत आहेत. नांदगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार कांदे यांनी केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात होणाऱ्या शेतकरी कॅम्प ची माहिती दोन दिवस आधी तसेच मोफत जे सी बी उपलब्ध करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.