Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपात प्रवेश

Mar 15, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही भाजप प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार अॅड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती.

अजून बातम्या वाचा..

कमलाबाई कासलीवाल विद्यालयात राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत इंद्रधनुष्य थाळी उपक्रम संपन्न

कमलाबाई कासलीवाल विद्यालयात राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत इंद्रधनुष्य थाळी उपक्रम संपन्न

राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयात इंद्रधनुष्य थाळी उपक्रम...

read more
आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबिराचा 350 लोकांनी घेतला लाभ

आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबिराचा 350 लोकांनी घेतला लाभ

नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष सहकार्याने नांदगाव शहरातील लोकांसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]