loader image
[ays_poll id=7]

बुद्ध,फुले,आंबेडकरांच्या जीवनातील पाणी संगर सामाजिक न्यायासाठीच होता – शरद शेजवळ, महाड क्रांती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीराना अभिवादन

Mar 20, 2023

येवला (प्रतिनिधी)
तथागत गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातून पाणी,पाण्याचा वापरावर सर्वांना समान अधिकार आहे हेच अधोरेखित करत असून पाण्याचा वापर हा सर्व सजीव,प्राणी पशूना निसर्गाने दिलेला व शिकवलेला सामाजिक न्याय आहे.बुद्ध,फुले,आंबेडकरांच्या जीवनातील पाणी संगर/संघर्ष हा सामाजिक न्यायासाठीच होता जो युगेनयुगे अखंड मानवास दिशादर्शन करील असे उदगार शरद शेजवळ यांनी काढले.
२० मार्च १९२७ च्या महाड क्रांती दिनाचे अवचित्य साधून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेत महाड क्रांती स्मृती अभिवादन सभेत मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ बोलत होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९४२ ते ४६ व्हाइसरॉय च्या मंत्रिमंडळात असतांना दामोदर विकास खोरे,सोननदी विकास खोरे,हिराकुंड नदी विकास खोरे स्थापवून त्या धरणांची कामे पूर्ण करून वीज मंडळ,लिफ्ट एरिकेशन (पाटबंधारे विभाग),नौका नयन,मत्स्य व्यवसाय,पर्यटन विकास मंडळ आदी पाणी विषयावर केलेली कामे हि आधुनिक भारताची पवित्र मंदिर असल्याचा भारताचे पहिले प्रधान मंत्री पंडित नेहरू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला गौरव पाणी व पाण्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांचे कार्य ह्या विषयावर अभ्यास पूर्ण माहिती शेजवळ यांनी ह्या वेळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश खळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यू शिरसाठ विकास सिंगाडे, सचिन धनवटे,राकेश बोरसे,सिद्धार्थ सिंगाडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ यांनी केले. अक्षय गरुड,ललित भांबेरे, साहिल जाधव,प्रमोद वाघ,अजित कळले,जीवन दळे,कुणाल ठाकरे,पंकज घुले आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.