loader image

नांदगाव / मनमाड बाजार समिती निवडणुक कार्यक्रम जाहीर

Mar 21, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाने राज्यातील बहुचर्चीत अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला असून त्यानुसार नांदगाव व मनमाड बाजार समितीची निवडणूक २८ व ३० एप्रील रोजी होणार असून नेमक्या कोणत्या तारखेला कुठली निवडणूक होईल हे येत्या २७ मार्चला निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहे.

नांदगाव व मनमाड बाजार समितीच्या निवडणूकी साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २७ मार्च ते ३ एप्रील पर्यत मुदत आहे .छाननी ५ एप्रील रोजी होणार असून वैध नामनिर्देशन ६ एप्रील रोजी प्रसिद्व होणार आहे. तर नामनिर्देशन पत्र ६ एप्रील ते २० एप्रील पर्यंत मागे घेता येतील . निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची वैध यादी जाहीर करूण २१ एप्रील ला चिन्ह वाटप होणार आहे.
यानंतर तालुक्यातील एका बाजार समितीची निवडणुक २८ एप्रील रोजी तर दुसऱ्या बाजार समितीची ३० एप्रील रोजी होईल व त्यानंतर लगेचच मतमोजणी होईल .
गेल्या ९ महिन्यातील राजकीय घडामोडी चा विचार करता शिवसेना शिदें गट व भाजपा विरूद्व महाविकास आघाडी यांचात सरळ लढत होईल . अशी सद्याची राजकीय परिस्थीती आहे.
आज दोन्ही बाजार समितीवर प्रशासकीय राजवट असली तरी दोन्ही बाजार समितीवर आ. सुहास कांदे यांचे वर्चस्व होते . आता होणाऱ्या निवडणूकी साठी आ. कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा दोन्ही बाजार समितीची सत्ता हस्तगत करण्यासाठी सरसावली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील माजी आ. जगन्नाथ धात्रक,पकंज भुजबळ,अनील आहेर,संजय पवार,राजेद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढेल असे चित्र आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.