loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या अर्थशास्त्र विभाग, आयक्यूएसी आणि जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसाची व्याख्यानमालेचे उद्घाटन

Apr 14, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या वतीने सामंजस्य करार अंतर्गत शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र मंठा यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 14 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान पंधरा दिवसाची ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. याचे उद्घाटन आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर चे प्र कुलगुरू गुरु डॉ.संतोष तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देविदासराव गोरे, अध्यक्ष जनाबाजी संस्था त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनील नरवडे प्रोफेसर अर्थशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कारकीर्द त्यांचे सामाजिक आर्थिक राजकीय कार्य यांचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मूल्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे प्रतिपादन केले.
या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र तसेच देशभरातून अनेक प्राध्यापक विद्यार्थी नागरिक, कनिष्ठ आणि वरिष्ठ उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कुलसचिव तसेच कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हजर होते. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सहयोगी संस्थेकडून प्रास्ताविक संचालिका विजया पाटील यांनी केले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन शेंडगे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले तर इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका कविता काखंडकी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.