loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा रहेनूमा फाउंडेशनच्या वतीने शिरखुर्मा वस्तु वाटप

Apr 19, 2023

रमजान ईद निमित्त आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार सुहास आण्णा साहेबांच्या मदतीने नांदगाव शहरात आणि आजू बाजूच्या खेड्या पाड्यातील मुस्लीम समाजातील गरीब, निराधार, विधवा, गरजवंत कुटुंबाला शिरखुर्मा साठी आवश्यक सुखामेवा वस्तूंचा किट तयार करून स्थानिकांच्या शिफारशी व सुझाव नुसार गरीब गरजवंत कुटुंबांना घरपोच वाटप करण्यात आले.
मुस्लीम धर्मीयांचा वर्षातील सर्वात मोठा सण “ईद-उल-फित्र” साजरा होत असताना आपल्या अवती भोवती असलेल्या गोर -गरीब कुटुंबांची ही ईद गोड व्हावी या उदार हेतूने आमदार सुहास आण्णा साहेबांच्या मदतीने शहरातील तसेच तालुक्यातील न्यायडोंगरी,परधडी, जातेगाँव, बोलठाण,भालूर सह आसपासच्या कुटुंबांना घरपोच शिरखुर्मा साठी आवश्यक वस्तू सुखामेवा सामानाचा किट ज्यात काजू, बदाम, पिस्ता, खोबरे सह एकूण 9 वस्तूंचा समावेश असून गरजवंत कुटुंबांना आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाऊंडेशनचे सभासद व स्थानिक कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाने घर घर जाऊन किटचे वाटप करण्यात आले.
या आनंदाच्या सणानिमित्त आमदार सुहास आण्णा साहेबांनी आपल्या सारख्या सामान्य जनतेचा विचार करून आपल्यासाठी, इतक्या महाग मोलाच्या वस्तू अगदी घरपोच पाठवल्याचे पाहून अनेकांची डोळे पाणावले सर्वांनी मनापासून सुहासआण्णा साहेबांना व रहेनुमा फाऊंडेशनच्या सदस्यांना दुआ देत आभारही मानले.

अजून बातम्या वाचा..

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

योगेश म्हस्के मनमाड : येथील उद्योजक आणि सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी 600 किमीचा सायकलिंग पुर्ण करून...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील वारकरी मंडळाना टाळ ‘मुर्दूग विणा साहीत्याचे वाटप

नांदगाव विधानसभा मतदार संघातील वारकरी मंडळाना टाळ ‘मुर्दूग विणा साहीत्याचे वाटप

आ. सुहास कांदे यांचा उपक्रमनांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव विधानसभा मतदारसंघातील कीर्तनकार महाराज...

read more
कांदा उत्पादक शेतकऱ्यावर   केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

कांदा उत्पादक शेतकऱ्यावर केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

नांदगाव सोमनाथ घोगांणेकेद्रं सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय केला असून कांदा...

read more
.