मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असुन महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ येणार आहे. मनमाडला सध्या १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊ शकते. शहरातील वागदर्डी व पाटोदा साठवणूक तलावात महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणाच्या आवर्तनावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
आकांक्षा व्यवहारे व तृप्ती पाराशर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार
आपल्या खेळाच्या गुणवत्तेवर मनमाड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचविणाऱ्या तृप्ती शेखर...










