loader image

नांदगाव बाजार समिती निवडणुकीत ९८.४९% मतदान – ३० एप्रिल संध्याकाळी मतमोजणी

Apr 29, 2023


नांदगाव – सोमनाथ घोंगाणे – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालक मंडळाच्या १८ जागासाठी शुक्रवारी (दि. २८) मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली असून १६६६ पैकी १६४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ९८.४९% टक्के मतदान झाले आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून
सकाळी अकरा वाजता
१९/८८ टक्के मतदान झाले होते. दुपारी बारा वाजेनंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. दुपारी १२ वाजता पर्यंत झालेले एकूण मतदान ५१ / २६ % तसेच दुपारी ३ वाजता ९४/०५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ४ वाजता * सोसायटी मतदार संघ :- ६१४ * ग्रामपंचायत मतदार संघ :- ५६६* व्यापारी मतदार संघ :- ३५० * हमाल तोलारी मतदारसंघ :- १११ एकूण झालेले मतदान :-१६४१ झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी ९८ / ४९% मतदान झाले असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

यावेळी १६६६ पैकी १६४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून रविवारी (दि. ३०) रोजी येथील नवीन तहसीलदार कार्यालयाच्या आवारात रोजी सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, पो.उ.नि. मनोज वाघमारे व सहकाऱ्यांनी चोख ठेवला होता.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.