loader image
[ays_poll id=7]

जीव आम्ही पेरला शेतात आहे। भूक आम्ही मारली पोटात आहे।।

May 17, 2023


पिंपळगांव बसवंत
कामगार,कष्टकरी,शेतकरी, शेतमजूराच्या व्यथा वेदना त्याचा न्यायासाठीचा संघर्ष बुद्ध,कबीर,तुकोबा,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा व वसा लोककवी वामनदादा कर्डकांनी ताह्यात जपत आपलं अवघ आयुष्य मानवता-माणुसकीचा विचार आपल्या काव्य-कवण-गीत शाहिरीतून मांडत भारतीय संविधानिक मूल्य विचार प्रचार प्रसार संवर्धित केला आहे.
शेतीमातीतील कष्टकऱ्यांचा संघर्ष,मानवी मतीची सांस्कृतिक अंगान मशागत करत वामनदादा कर्डक लिहीत तोच विचार-वारसा त्यांच्या १९ स्मृतिदिन “लोकशाहीर दिना”च्या निमित्ताने लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान,नाशिक यांनी आयोजित शाहिरी अभिवादन सभेत जोपासला गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी गायक भास्कर अमृतसागर (धुळे) हे होते.

जीव आम्ही पेरला शेतात आहे।
भूक आम्ही मारली पोटात आहे।।

नाद माझा सोड! आता सोड! बाई
देह माझा गुंतला कष्टात आहे।
ह्या अतुलकुमार ढोणे,
डेहणी (यवतमाळ) यांच्या गझलेने काळजाचा ठाव घेतला.

येवला येथील गझलकार सचिन साताळकर यांनी “गजरे जरी फुलांचे या माळतात पोरी
पण बंधने युगांची का पाळतात पोरी ?

वाटेत खाचखळगे इतके परंपरांचे
प्रत्येक पावलाला ठेचाळतात पोरी

वाजे नकार घंटा त्यांच्या चहूदिशांनी
रस्ते तरी यशाचे धुंडाळतात पोरी

घाण्यास जुंपलेले आयुष्य हे तरीही
जन्मावरी स्वत:च्या पण भाळतात पोरी

अंधार दूर करण्या , दोन्ही घरे उजळण्या ,
होवून वात जीवन ह्या जाळतात पोरी

कर्जात गुंतलेल्या बापास वाचवाया
आगीसही सुखाने कवटाळतात पोरी

ह्या गझलेतून स्त्री जीवनाची व्यथा वेदना आणि शील संस्कार अधोरेखित केले.

जात व जात व्यवस्था हि देशाला लागलेली कीड आहे ती नष्ट करण्यासाठी राजेंद्र देवरे,पुणे यांनी “तुझ्या माझ्या चव्हाट्यावर आलेल्या गोष्टी लोकांसमोर मांडू जात,धर्म, सगळ विसरून.
मग बघू कोण स्वीकारत ते आपल्याला…

तुझ्या गर्भातून जन्मतील क्रांतिकारी विचारांचे स्वातंत्र्याचे धडे गिरवनारे मोकळ्या आकाशात स्वातंत्र्याची भरारी घेणारे पाखरं”. हि रचना दाद मिळून गेली.

कवी गायक भास्कर अमृतसागर यांनी लोकशाहीत राजकीय पक्ष नेते आपले वैचारिक अधिष्ठान कसे हरवून बसले आहेत व महापुरुष-सुधारकांच्या नावाचा जप करत कसे त्यांचे विचार पायदळी तुडवत आहेत हे सांगताना म्हणाले की,

बापाच्या या कामाईवरती,उड्या मारतोय टुणा टुणा।
आज भीमाचा बंगला फोडून बेट्या,बाप म्हणतोय कुणा-कुणा।।

कवयित्री कल्पना तेंभुर्णीकर (नागपूर),आरती खरात (अहमदनगर),गणेश निकम (चाळीसगाव) यांनी आप-आपल्या सामाजिक आशय-विषयाची काव्य,गीतातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
युट्युब लाईव्ह पद्धतीने संपन्न झालेल्या लोकशाहीर दिनास मोठ्या संख्येने प्रेक्षक श्रोत्यांनी सहभाग घेत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृती कार्यास अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी केले.तांत्रिक साहाय्य मिलिंद पगारे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.