loader image
[ays_poll id=7]

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

Jun 14, 2023

मनमाड – तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि.१२/०६/२०२३ रोजी बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त मनमाड शहर न्यायालयाचे न्यायाधीश महेशकुमार टी. खराडे यांचे अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते मनमाड वकील संघा चे अध्यक्ष अॅड. किशोर सोनवणे आणि विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. गिरीष पवार हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात ॲड. किशोर सोनवणे यांनी पर्यावरण दिनाचे महत्व विषद केले आणि बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी विव िध उपाययोजनाची माहिती दिली. तसेच अॅड. गिरीष पवार यांनी पर्यावरण दिन व बालकामगार विर ोधी दिन यासंबंधी विविध देशातील चळवळी बाबतचा इतिहास आणि भारत सरकारने बालकामगारांबाबत केलेले नविन कायदे विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महेशकुमार टी. खराडे यांनी निसर्ग व सजिव सृष्टीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने वृक्षांची लागवड व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे तसेच अनाथ, निराधार व निराश्रीत बालकांसाठी शिक्षण व्यवस्था, अनाथालय, रोजगार प्रशिक्षण इ. उपक्रम राबवुन बालकामगार प्रथा नष्ट करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. पुजा मल्हारे यांनी केले. कार्यक्रमास रेल्वे न्यायालयाचे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता मोरे , माजी अध्यक्ष ॲड सुधाकर मोरे, उपाध्यक्ष अॅड. एस. पी. पाटील, खजिनदार अॅड. संजय गांधी, सहसचिव अॅड. बापट, ॲड.एस. पी. महाजन, अॅड. वाल्मिक जगताप, अॅड. अमित सोनवणे, तसेच मनमाड न्यायालयातील सर्व कर्मचारी व पक्षकार आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.