loader image
[ays_poll id=7]

भारतीय योग शास्त्र सर्वोतम मानवी जीवन शैलीचा आधार :: सौ स्वाती मुळे

Jun 21, 2023


भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न मनमाड – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.त्यानंतर विश्व योग दिन साजरा करण्यात येऊ लागला
भाजपा मनमाड शहर मंडलाच्या वतीने भारतीय संस्कृती चा गौरव दिन म्हणून संबोधले जाणाऱ्या नवव्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्ताने बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी 8 – वाजता पल्लवी मंगल कार्यालय मनमाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा महिला मोर्चा च्या नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रख्यात योग प्राध्यापिका सौ.स्वाती प्रमोद मूळे सह योग शिक्षिका सौ वर्षा गौरव मुळे ,भाजपा मनमाड शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. योग प्राध्यापिका सौ स्वाती मुळे व सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करून योग अभ्यास कार्यक्रम चा शुभारंभ झाला. योग प्राध्यापिका सौ स्वाती मुळे यांनी योगप्रार्थना, योग गीत सादर करीत योग शास्त्र व योग दिनाचे अत्यंत अभ्यास पूर्ण आणि सोप्या भाषेत महत्व विशद केले आणि योग शास्त्रतील 10 आसनांचा प्राथमिक अभ्यास प्रात्यक्षिक सह त्यांनी मार्गदर्शन करून उपस्थिततांन कडून करवून घेतळा सौ वर्षा मुळे यांनी मार्गदर्शक योग आसन प्रात्यक्षिक मंचावर सादर केली या योग अभ्यास कार्यक्रमास जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन भाजप शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशीं भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार,भाजपा दिव्यांग आघाडी चे शहराध्यक्ष दीपक पगारे,,भाजपा शहर सचिव सुमेर मिसर ओबीसी आघाडी चे शहराध्यक्ष गोविंद सानप , अमित सोनावणे, पियुष गंगेले,ट्रान्सपोर्ट आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील शहर उपाध्यक्ष मूर्तझा रस्सीवाला,राष्ट्रीय स्वयंम सेवक संघांचे अनंता भामरे, राजेंद्र गुप्ता, विकास देशमुख, वेदिका मंडळा च्या सौ वैष्णवी पुरंदरे, सौ रुपाली गंगेले, सौ वृंदा शेटे, कु श्रावणी पुरंदरे, पार्थ गंगेले, सुनील न्यायदे,आदी प्रमुख सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,नितीन परदेशी, दिपक पगारे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.