loader image
[ays_poll id=7]

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे उद्घाटन संपन्न

Jun 30, 2023


नांदगाव – शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते आज नांदगाव येथे सार्वजनिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न झाले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच खासदार केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नांदगाव येथे शिवनेरी शासकीय सभागृह शेजारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह ( मीटिंग हॉल) बांधण्यात आले आहे.
शंभर दीडशे लोकांची बैठक होईल असा अद्ययावत सुविधा असलेला वातानुकूलित मीटिंग हॉल बांधण्यात आला आहे.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत या हॉल चे उद्घाटन आज जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, प्रमोद भाबड, विष्णू निकम सर, राजाभाऊ जगताप, डॉक्टर सुनील तुसे, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, बाजार समितीचे सभापती बंडू पाटील, माजी सभापती तेज दादा कवडे, उपसभापती पोपट सानप, कैलास पाटील, एकनाथ सदगीर, सतीश बोरसे, काना कलंत्री, निलेश इप्पर, आनंद कासलीवाल, राजाभाऊ देशमुख, डॉक्टर संजय सांगळे, मयूर भाऊ बोरसे, महेंद्र नाना दुकळे, आबा देवरे, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, रमेश पगार, अण्णासाहेब पगार, भैय्या पगार, डॉक्टर प्रभाकर पवार, डॉक्टर प्रवीण निकम, अंकुश कातकडे, सर्जेराव भाबड, किरण गायकवाड, आप्पा कुनगर, कपिल तेलोरे, आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.