नांदगाव तालुक्याचे आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून व वाल्मीक आप्पा आंधळे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या नवयुवक अद्यावत व्यायाम शाळा बुधलवाडी मनमाड येथे व्यायाम शाळा लोकार्पण सोहळा मंगळवारी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुमताई कांदे व युवासेनेचे जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी नांदगाव तालुक्याचे तहसीलदार मोरे उपस्थित होते.
काही दिवसापूर्वी वाल्मीक आप्पा आंधळे तसेच धनंजय आंधळे यांनी अनेक वर्षांपासून साहित्य अभावी बंद असलेल्या जिम च्या परिस्थितीबाबत आमदार सुहास अण्णा कांदे तसेच सौ अंजुमताई कांदे यांना माहिती दिली असता होम मिनिस्टर या कार्यक्रम दरम्यान तात्काळ या जिमसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते.
सांगितल्याप्रमाणे तात्काळ कांदे कुटुंबीयांकडून अद्यावत साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
तसेच जिमचे सर्व काम करून आज सौ.अंजुमताई कांदे व फरहान दादा खान यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले.
या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष सुनील हांडगे,तालुका तालुकाअध्यक्ष साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, बबलू पाटील, राजाभाऊ भाबड, आझाद पठाण, जाफर मिर्झा, आसिफ शेख, निलेश ताठे, ,अरुण अंकुश ,राहुल सांगळे,पिंटू वाघ, दिनेश घुगे, गणेश केदारे, गणेश सांगळे ,दादा घुगे, दशरथ जाधव, ललित आंधळे, रोशन गवारे, विनोद देशमुख, मोनु बच्छाव, संजय दराडे, राहुल घुगे ,अथर्व काथवटे आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व परिसरातील नागरिक तरुण वर्ग उपस्थित होता.
“काळ्या रंगात भक्तीचा उजळ प्रकाश!” — चांदवडच्या शिक्षकाची आगळीवेगळी विठ्ठलभक्ती
चांदवड | आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील...










