Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सप्तशृंगी गडाच्या घाटात बस दरीत कोसळली – अनेक प्रवाशी जखमी

Jul 12, 2023

आज पहाटे ६.३० च्या दरम्यान सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे
सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव शहरात कडक दुष्काळ असतानांही रेल्वे गेट जवळील अंडर बायपास मध्ये...

read more
दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

नांदगाव सोमनाथ घोगांणेशासन निर्णय एससीवाय २०२३/प्र. क्र.३७/म-७ दि.१० नोव्हेंबर २०२३ नुसार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]