loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन संपन्न

Jul 13, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभाग, एन.सी.सी. विभाग व स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून महिलारत्न पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय मालेगाव येथील प्राध्यापक डॉ. डी. ए.पवार हे उपस्थित होते.याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना खंडानुसार, देशनिहाय, व राज्यानुसार जगाची, देशांची व राज्यांची लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत गेली याची इत्यंभूत आकडेवारी त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितली. जन्मदर,मृत्युदर, कुटुंब नियोजन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन त्यांनी केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. निकम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मानव एक साधन- संपत्ती या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे असून ज्या पद्धतीने लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात एक नंबरचा देश आहेत त्याच पद्धतीने विकासामध्ये सुद्धा आजच्या तरुण पिढीने मोलाचे सहकार्य करून आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डी. व्ही. सोनवणे यांनी जागतिक लोकसंख्या दिन का साजरा केला जातो ? हा मूळ उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन भूगोल विभागातील प्रा.प्रकाश बर्डे यांनी केले तसेच प्राध्यापक जनार्दन गावित व प्राध्यापिका विजया सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालय उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. जी. एल. शेंडगे, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक रोहित शिंदे, नॅक समन्वयक प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे, हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक जे.वाय. इंगळे प्राध्यापक डॉ. विष्णू राठोड, इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापिका कविता काखंडकी मॅडम तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.