भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
झाशीची राणी लक्ष्मीबाई नवदुर्गा महिला नवरात्रोत्सव मंडळ आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण राजेश कवडे यांच्या हस्ते संपन्न
नांदगाव सोमनाथ घोंगाणे शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट) येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई नवदुर्गा...











