loader image
[ays_poll id=7]

मोकाट कुत्र्यांचा वडगाव परिसरात धुमाकूळ; हरणाच्या पाडसाची गावकऱ्यांनी केली सुटका

Aug 2, 2023

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू गावच्या शिवारात हरणाच्या कळपातील एक लहान हरणाच्या पाडसाची सुटका मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून करण्यात सामाजीक कार्यकर्ते भागवत झालटे व नागरिकांना यश आले. या मोकाट कुत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच वाकी खुर्द येथे मोरावर हल्ला केला होता. या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी, नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील वडगाव पंगु येथील सोसायटीचे चेअरमन नवनाथ सूर्यभान गोजरे यांच्या शेतात आज (दि.१) रोजी हरणांच्या कळपामागे मोकाट कुत्रे लागले होते. त्यात एक लहान हरणाच्या पाडसाला कुत्र्यांनी घेरल्याने त्यांची गोजरे कुटुंबीयांनी सुटका केली. या हल्ल्यात हरणाच पाडस बेशुद्ध पडले होते. यावेळी शेतकरी गोजरे यांनी समाजसेवक भागवत झालटे यांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी झाल्टे यांनी घटनास्थळी पोहचून हरण पडसाला दूध व पाणी पाजले. त्यांनतर काही वेळाने हरणाच पाडस शुध्दीवर आले. यावेळी येवला वनरक्षक सोनाली वाघ, अंकुश गुंजाळ यांनी घटनास्थळी पोहचून पडसाला ताब्यात घेत तालुक्यातील वागदर्डी येथे वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले त्यावेळी वन कर्मचारी अंकुश गुंजाळ, समाजसेवक भाऊसाहेब झाल्टे, किरण बोरसे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु चिराग निफाडकरची नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19 संघाच्या संभावित खेळाडुच्या यादीत निवड. पहिल्या निवड चाचणी सामण्यात 03 बळी

भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु चिराग निफाडकरची नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19 संघाच्या संभावित खेळाडुच्या यादीत निवड. पहिल्या निवड चाचणी सामण्यात 03 बळी

  ऑक्टोबर 23 मध्ये नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघाची निवड चाचणी नाशिक येथे संपन्न...

read more
नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्याय्यकारक तरतुदी रद्द कराव्यात -महेद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ( पवार गट )

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्याय्यकारक तरतुदी रद्द कराव्यात -महेद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ( पवार गट )

  नांदगाव सोमनाथ घोगांणे केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी...

read more
विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना  पोहचवले जात आहे शाळेत….  वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना पोहचवले जात आहे शाळेत…. वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

नांदगाव : हम चले स्कूल पण स्कूल बस धक्कास्टार्ट असल्याने पोखरी घाटात बंद पडलेल्या स्कूल बसला धक्का...

read more
.