loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( NEP)2020 व्याख्यान संपन्न

Aug 4, 2023

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाणीव जागृती सप्ताह निमित्त व्याख्यानाचे तिसरे पुष्प महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे यांनी आपल्या मनोगतातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा आकृतीबंध विद्यार्थी व प्राध्यापकांना समजावून सांगितला या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय व समन्वय दृष्टिकोन, मातृभाषेतून शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळे व्यतिरिक्त शिक्षण देण्याची व्यवस्था, शिक्षकांना संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी तसेच दहावीची बोर्ड परीक्षा समाप्ती यासारख्या ठळक मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता व आवश्यकता तसेच विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हे धोरण उपयुक्त आहे असे मत त्यांनी व्यक्त केले हे धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास परिणामी तो देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे या धोरणाला यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांना उचलावी लागणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, ज्येष्ठ प्रा. डॉ. जे.डी वसईत, डॉ. आर. डी. भोसले, महाविद्यालयातील सर्व प्रा. उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ प्रा. डॉ. जे.डी वसईत यांनी केले आभार प्रा. गणेश गांगुर्डे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.