loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर केट ने राबविला ‘ मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रम

Aug 11, 2023

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन केटतर्फे संपूर्ण भारतभर ९ ऑगस्ट पासुन ‘ मेरी माटी मेरा देश ‘ हा अभियान राबविला जात आहे. त्यानुसार मनमाड शहरात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आला.

भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र टीम केटचे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी पाच प्रतिज्ञा सांगितल्या व सर्व व्यापारी वर्गांनी हातामध्ये आपल्या मातृभूमीची माती घेऊन प्रतिज्ञा केली की भारत मातेचे सेवेसाठी व भारताला महासत्ता करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. शहराध्यक्ष चेतन संकलेचा, उपाध्यक्ष योगेश भंडारी, सचिव कुमार मेहानी, सहसचिव प्रमोद भाबड, मार्गदर्शक राकेश ललवाणी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ व्यापारी गुरूदिपसिंग कांत, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सोनवणे , संघटक सुरेश लोढा, मनोज जंगम, संजय मुथा, राजेंद्र गुप्ता, संदेश बेदमुथा, कन्हैया दौलानी, आनंद लोढा, परेश बुरड, कुलदीपसिंह चोटमुरादी, राजु लुणावत, दीपक शर्मा, अमोल देव, नितिन आहेरराव, ललित पाटणी, मुर्तुझा बोहरी आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र केट सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.