loader image

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

Aug 11, 2023


अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे सगळ्यांनाच जमतेच असे नाही. आर्थिक परिस्थिती आणि त्यासाठी येणारा खर्च यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. पण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांच्यात बुद्धिमत्ता आणि जिद्द असते अशा अनुभवी विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांकडून शिष्यवृत्ति प्रदान केली जाते. या पर्यायाची बऱ्याचशा मुलांना कल्पना नसते. खेळ तसेच उच्चशिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा फायदा नाशिकच्या सुशील पवारने करून घेतला आहे. सुशीलला त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चक्क अमेरिकेत पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. सुशील यांचा अमेरिकेतील गुणगौरवाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच कौतुक देखील केलं आहे. “proud moment for india” “नाशिकचं नाव उंचावलंस भावा” अश्या कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव त्यांच्यावर होताना पाहायला मिळत आहे.

सुशीलच्या या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेऊयात… नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील रहिवासी असलेले ‘सुशिल पवार’ या ध्येय्यवेड्या तरुणाने अमेरिकेत शिष्यवृत्तिच्या जोरावर त्याचं हे स्वप्न पूर्ण केले आहे. सुशिल पवार यांचे डेंटिस्ट्री मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना त्यांना ओरल कैंसरमध्ये संशोधन करण्याची संधी टाटा कैंसर रिसर्च इंस्टिट्यूट, मुंबई येथे मिळाली. सदर संशोधनला ५ ते ६ वर्षाचा कालावधी लागला. या संशोधनला लागणारा नमूना संकलन त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंतमहाविद्यालय, नाशिक येथे केले. या नमुन्याचे संशोधन ते टाटा कैंसर रिसर्च इंस्टिट्यूट (मुंबई) येथे करत असत. या दरम्यान त्यांनी काही वर्ष पिंपळगाव बसवंत येथे प्रॅक्टिस देखील केली. २०२१ मध्ये हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश जर्नल ऑफ़ कैंसर या जगातील नामांकित कैंसर जर्नलच्या ओरिजिनल रिसर्च या श्रेणी मध्ये प्रकाशित झाले. या कामासाठी त्यांना डॉ तनूजा तेनी ( रिसर्च हेड, टाटा इंस्टिट्यूट, मुंबई ) व डॉ प्रदीप जी. एल.( प्राचार्य , दन्त महाविद्यालय, नाशिक) यांचे मार्गदर्शन लाभले.या संशोधनाच्या जोरावर पुढील पदव्युत्तर शिक्षण व रिसर्च साठी त्यांची अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात निवड झाली. विद्यापीठाने त्यांचा रिसर्च व गुणवत्ता बघून त्यांना शिष्यवृत्ति दिली. ज्यात ९० टक्के शिक्षणाचा खर्च व स्टाइपेंड विद्यापीठाकडून देण्यात आला . आज त्यांचा विद्यापीठाकडून “बेस्ट आउटस्टैंडिंग रिसर्च इन पब्लिक हेल्थ” अवार्ड देऊन गौरव करण्यात आला. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असून या प्रवासात त्यांना त्यांचे आई सुनीता पवार व वडील शिवाजी पवार तसेच सासु सासरे वर्षा आणि भाऊसाहेब सूर्यवंशी आणि पत्नी कविता सूर्यवंशी – पवार यांची मोलाची साथ लाभली. सुशील सांगतात कि अमेरिकेत बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना संधी देखील उपलब्ध आहेत यासाठी मुलांनी त्या शोधून इमेल आणि कम्युनिकेशन साधून संधीच सोनं केलं पाहिजे.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.