loader image

संत झेवियर हायस्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Aug 19, 2023


मनमाड:-येथील संत झेवियर हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. श्रीमती सिडोणी परेरा मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, प्राथमिक शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.अर्चना निकाळे मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. राँल्फी सर, फादर लॉईड , सेंट मेरीज चे माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी श्री.गुरुदीपसिंग कांत, श्रीमती भारती राव, श्री.बालू नारायण, श्री चार्ल्स लोपस,शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.मुकुंद झाल्टे, उपसचिव सौ.शुभदा वाघ आदी मान्यवर तसेच सेंट मेरीज हायस्कूलचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सुधाकर कातकडे तसेच श्री दत्तू जाधव , स्वप्नील बाकळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गटातील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना दिली. सौ अंजलीना झेवियर व श्री अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायन ग्रुपने देशभक्तीपर गीत सादर केले. प्रतिज्ञा ,राष्ट्रध्वज प्रतिज्ञा, संविधान तसेच पंचप्रण प्रतिज्ञाचे वाचन मयूर मुंडे, आर्यन जोगदंड व तेजस्वी काशीदे या विद्यार्थ्यांनी केले. कु. अनुजा बोराडे व हेमंत वाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती परेरा मॅडम यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या देशभक्तांप्रति क्रांतीकारकांप्रति आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. तर मुख्याध्यापक फादर म्याल्कम यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कु. हर्षदा कांबळे हीने आपल्या भाषणातून देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक फा. म्याल्कम व पर्यवेक्षिका सि.ज्योत्स्ना यांनी केला. एस.एस.सी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आभारप्रदर्शन सौ. ज्योती वाघ मॅडम यांनी केले. ‌प्राथमिक शाळेतील पुढील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक , सामाजिक, वैज्ञानिक क्षेत्रातील विविध प्रसिद्ध, थोर अशा व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. विराज पंकज गंगावणे, आशिष रविंद्र मकासरे-( महात्मा गांधी), दीक्षा आनंद गायकवाड, लावण्य राकेश निकाळे, प्रांजल त्रिभुवन- (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले) ,
अद्वयपुष्प भूषण आव्हाड -(भगतसिंग), क्रिस्तीना विराज मार्गे, श्रद्धा सतीश जाधव, समृद्धी मयूर गायकवाड, इन्शेरा सय्यद, सिल्विया विशाल चंदनशिव- (झाशीची राणी), आकांक्षा स्टीवन आहिरे- (भारत माता) ,शिव तुषार संसारे -(नेताजी सुभाषचंद्र बोस), देवांश दराडे,आरव आव्हाड, दिगंबर रंगनाथ ढोमसे- (छत्रपती शिवाजी महाराज ),सिद्धेश मनोज गांगुर्डे- (लोकमान्य टिळक), किरण राजेंद्र अहिरे- (सुनीता विल्यम), आरोही महेंद्र खरे- (अँनी बेझेंट), इकरा गुमेर बॅग- ( बेगम हजरत महेल).
याप्रसंगी आजी-माजी विद्यार्थी,पालक व आजी-माजी शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
.