
मनमाड येथील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांचे चिरंजीव प्रज्वल बोथरा यास नगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे माँ हुलसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जैन धर्माचे आचार्य सम्राट प.पु.आनंदऋषीजी म.सा. यांचे जन्मगाव चिंचोडी येथे आनंदतीर्थ महिला परिषद यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जैन धर्मातील महत्वाचे प्रतिक्रमण ही अतिशय कठीण अशी विधी पुर्ण केल्याबद्दल प्रज्वलला सन्मानित करण्यात आले.













