loader image

हिसवळ खुर्द येथील खडी क्रेशर बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन

Aug 23, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील हिसवळ खु. ग्रामपंचायत हद्दीत व मांडवड शिवारात सुरू असलेले एस.ए.यादव कन्स्ट्रक्शन यांचे खडीक्रेशर हे दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असल्या कारणाने त्वरीत बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत हिसवळ यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मांडवड ता. नांदगाव येथील गट ६५.२ मध्ये एस.ए.यादव कनस्ट्रक्शन मार्फत डोंगर फोडुन खडी क्रेशरच्या माध्यामातून मोठे काम चालू असून विविध वाहनांमार्फत खडीची वाहतुक केली जाते. वरील खडीक्रेशर हे मांडवड महसुल हद्दीत असले तरी संबंधित खड़ी क्षेत्र हे हिसवळ गावचे रहिवाशी हदीत आहे. सदर खडी क्रेशर हे हिसवळ खुर्द गावापासून नऊशे मिटर अंतरावर असून २४ तास खडीक्रेशर सुरु असते त्यातुन निघना-या धुळीच्या कामामुळे गाव परीसरातील रहिवाशाच्या आरोग्यावर गंभीर परीणाम होत आहे . सध्या सुरु असलेल्या दुष्काळी परीस्थीतीत विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण सुरु आहे. उत्खनन करण्यासाठी मोठ्याप्रमाणात स्फोटके, ब्लास्टींग केली जाते त्या हादऱ्यामुळे परीसरातील विहीरीच्या पाणीपातळीवर गंभीर परीणाम होत आहे. पाण्याची पातळी संपुष्टात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे खुप मोठे नुकसान होत आहे, यापूर्वी सदर खडी क्रेशरमुळेचे परीसराचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे तसेच अनेक वन्यजिवांची यामुळे प्राणहानी झालेली असून ब्लास्टींगमुळे अनेक पशुपक्षी मृत होत आहे. त्यामुळे वन्यजिवांचा वावर कमी झालेला आहे. सदरचे खडीफ्रेशर तीन वर्षांपासून सुरु असुन संबंधीत एम. ए. यादव कनस्ट्रक्शन कंपनीस वेळोवेळी विनंती करून सदर बाबीचा खुलासा करून देखील त्यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहे.
तरी वरील कारणांचा विचार करता मौजे खुर्द ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांची आपणास विनंती करण्यात करण्यात येते की, संबंधीत एस.ए.यादव कंपनीचे काम त्वरीत थांबविण्यात यावे व संभाव्य दुष्काळ सदृष्य परिस्थितीत सर्व ग्रामस्थ शेतक-यांना न्याय द्यावा असे म्हटले आहे. निवेदनावर प्रभारी सरपंच संजय आहेर, नानासाहेब आहेर, बेबीबाई कदम, वैशाली आहेर, मनिषा आहेर, लता आहेर, सरस्वती लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.