अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून आज आंदोलकांनी विविध पद्धतीने पास घेऊन ३० ते ४० आंदोलकांनी मंत्रालयात प्रवेश केला आणि मागण्या संदर्भात घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा जाळ्यावर घोषणा देत आंदोलन केले. या शेतकऱ्यांचे १९७२ मध्ये धरणासाठी जमीन अधिग्रहन केले होते. मात्र या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही, तसेच स्थानिकांना नोकरी देण्यात आलेले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले होते, आज हे आंदोलन मंत्रालयात केले आहे.
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा
मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...









