बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी )जि. नाशिक.अंतर्गत आ.श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी तसेच शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शना खाली
कार्यरत असणाऱ्या मनमाड विभागातील अंगणवाडी सेविकाताई व मदतनिसताई यांनी मनमाड येथे पोषण माह(१ ते३० सप्टेंबर )२०२३चे उद्घाटन करण्यात आले.आज ताईनी पोषण दिडींचे आयोजन करुन भारत मातेच्या वेशभुषेत तसेच विविध वेशभुषेत रँली काढण्यात आली..साक्षर भारत या थिमवर पथनाट्य करण्यात आले.. विविध कार्यक्रम घेवुन पोषण अभियानाचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कुपोषण निर्मुलनाबाबत,आरोग्य शिक्षणाविषयीचे संदेश लोकांपर्यन्त पोहचविण्यासाठी जनजागृती या अभियानात केली जाणार आहे.. पोषण अभियान हे जनतेचे आंदोलन व्हावे..तसेच ही एक लोक चळवळ व्हावी..यामाध्यमातुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत घडावा…हाच प्रयत्न केला जाणार आहे. .मोठ्या मेहनतीने तसेच सकारात्मक विचार करुन ह्या पोषण माहमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग घेवुन त्यांच्या पोषणाचे वर्तनात बदल घडवुन सर्व बाबी समजावुन सांगुन चांगल्या पोषणाची सवय लावणे हाच प्रयत्न राहणार आहे…
संवेदनशील दीपावली फलक रेखाटन
दिवाळी भारतातील सर्व धर्मियांचा सर्वोच्च सण आहे. रोषणाई,उल्हास,प्रेम,मैत्री,व मानवतेने...












