मनमाड : येथील जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने रक्षा बंधन उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्य रस्त्याच्या चौकात स्टॉल लावून जाणाऱ्या-येणाऱ्या समाज बांधवांना राखी बांधून आपल्या कार्याची माहिती देत सामाजिक एकात्मता जपण्याचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ जनजाती कल्याण आश्रम असा फलक लावून अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी , सचिव शशिकांत भागवत , खजिनदार दामोदर पवार सर मार्गदर्शक प्रकाश गाडगीळ सर व अन्य कार्यकर्ते वाहतूक करणाऱ्या सर्व समाज बांधवांना , पादचारी , दुचाकी चारचाकी , रिक्षचालकांना स्टॉल जवळ थांबवून आकर्षक असे माहिती पत्रक देत आपल्या कार्याची माहिती देऊन आणि हाताला राखी बांधून बंधूभावाचा संदेश प्रत्यक्षात देत होते . दुपारी चार वाजता सुरू केलेला हा उपक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता व सुमारे चारशे ते पाचशे बांधवांना राखी बांधून हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या उपक्रमासाठी हेमंत पेंडसे , प्रमोद मुळे , आनंद काकडे , अक्षय सानप , महेश नावरकर , रमाकांत मंत्री , अजय , अथर्व लाळे , विक्रम सप्रे व अन्य सहकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला अशाच प्रकारचा आणखी एक कार्यक्रम कॅम्प विभागात मारुती मंदिराच्या परिसरात देखील करण्यात आला , त्याठिकाणी श्रीधर सांगळे , सुनील पगारे आणि कातकडे बंधूंच्या सहकार्याने मोहन कीर्तने यांनी पुढाकार घेतला सर्व कार्यक्रमाला रंगनाथजी कीर्तने यांचे मार्गदर्शन लाभले .




















