loader image

मनमाड शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

Sep 7, 2023


मनमाड :(योगेश म्हस्के)श्रावण महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला मध्यरात्री श्री कृष्णाचा जन्म झाला होता. दरवर्षी मोठ्या उत्साहात संपुर्ण देशभर श्री कृष्ण जन्माष्टमी अनेक मंदिरांमध्ये आणि घरोघरी मोठ्या उत्साहात आणि भक्ति-भावाने साजरा केला जातो.

शहरातली श्रीकृष्ण भक्तांनी आपल्या घरी सुंदर अशी फुलांची आरास सजवून , रांगोळी काढुन कृष्णजन्माची तयारी केली होती.बुधलवाडी येथे भजनी मंडळ आणि नागरिकांनी भजन ,पुजन करून रात्री बारा वाजता पाळणा म्हणून आणि आरती करुन श्री कृष्ण जन्म उत्सव साजरा केला. काही भक्तांनी केक कापून तर काहींनी आपल्या घरातील लहान मुलांना श्री कृष्णाच्या रुपात सजवुन आपल्या लाडक्या श्री कृष्णाचा जन्म दिवस साजरा केला.

 


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
.