येवला तालुक्यातील कातरणी व चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु शिव शिवरस्त्या लगत राहत आसलेले
श्री भाऊसाहेब बाळा कदम कातरणी यांच्या गट नंबर 59 मध्ये आज दि. 18/09/23 रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोन कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर जखमी झाले. कुत्र्यांनी त्याचा एक डोळा निकामी केला मोराच्या सर्वांगावर मोठ्या प्रमाणात चावा घेऊन जखमी केले होते. सोमनाथ यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते निसर्ग प्रेमी भागवत झाल्टे कातरवाडीकर यांना दिली असता झालटे यांनी वन विभाग कर्मचारी वनरक्षक सोनाली वाघ मॅडम चांदवड यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली त्यांनी त्वरित आपले वनविभाग कर्मचारी भाऊसाहेब झाल्टे व बाळू सोनवणे यांना पाचारण करत लांडोर मोराला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी तळेगांव येथील शासकीय रुग्णालयात आणले परंतु उपचारा दरम्यान मोराचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली
त्या ठिकाणी भाऊसाहेब कदम अंकुश रसाळ रवी कदम समाधान गोजरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मोकाट श्र्वानाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा कारण ते इतके हिंस्र झाले आहे की माणसावरती पाळीव प्राण्यांवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करत आहे त्यामुळे यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी झाल्टे यांनी केली आहे
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन
शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...











